नांदेड (प्रतिनिधी) -भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ बाबत जनसामान्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड परिक्षेत्राच्या वतीने मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप , लाप्रवि नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पथनाट्यातून भ्रष्टाचाराचे वास्तव मांडले जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड समोर एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक आणि GenZ (युवा पिढी) विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे शासकीय आणि निमशासकीय विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेला कोणत्या प्रकारे लाचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडून युवा पिढीला मार्गदर्शन पथनाट्य सादरीकरणानंतर एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षक श्री. जोशी सर आणि GenZ विद्यार्थ्यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी तरुणांशी संवाद साधून त्यांना समाज परिवर्तनासाठी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी मार्गदर्शन केले. नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास किंवा एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. लाचेबाबत तक्रार करणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. संपर्क साधण्यासाठी माहिती: टोल फ्री क्रमांक: १०६४ लाप्रवि नांदेड युनिट: ९२२४८४८९९९ / ८९५६५०९०६४ ईमेल: dyspacbnanded@mahapolice.gov.in भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाप्रवि नांदेड युनिटतर्फे करण्यात आले आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-12-at-09.45.21.mp4 Kanthak Suryatal Post Views: 686 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुड बाय इंडिया, चीनमध्ये भेटू!- अरुणाचलमधील तरुणाच्या व्हायरल व्हिडिओने सरकारची चिंता वाढवली गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड मनपा सज्ज; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात प्रतिज्ञापत्र सादर;प्रतिज्ञापत्र अर्धवट खरे