नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्रालय नेमके काय काम करते, हे कदाचित स्वतः गृहमंत्र्यांनाही माहित नसेल, पण नांदेडच्या लिंबगाव पोलीस ठाण्यातील काही विद्वान सहायक पोलीस निरीक्षकांना मात्र त्याची इत्थंभूत माहिती असते असी त्यांनी मागीलवर्षी प्रसिद्ध केले होते. सध्या नांदेडमध्ये या भविष्यवेत्त्या पोलिसांच्या चर्चेने चांगलाच फेर धरला असून, सोमवार ते गुरुवार हे चार दिवस जिल्ह्याला एखादी आनंदाची बातमी मिळणार असल्याची वाट नांदेडकर जनता पाहत आहे. गृहखात्याचे पॅरलल मंत्रालय? लिंबगावचे एक सहायक पोलीस निरीक्षक, जे तेव्हा वाळूच्या प्रकरणातील गडबडीमुळे आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकून नियंत्रण कक्षात विश्रांती होते. ते सध्या फोनवरून भविष्यवाणी करण्यात व्यस्त आहेत. त्यांचे म्हणणे असे की, १५ ऑगस्टच्या आधी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची बदली होणार आहे. विशेष म्हणजे, माजी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार आपल्यावर अतोनात प्रेम करतात, त्यामुळे आपण लवकरच पुन्हा दिमतीला हजर होऊ, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता. आता हे प्रेम वर्दीतले आहे की अन्य कशातले, हा संशोधनाचा विषय आहे! बदली एक्स्प्रेसचे किंगमेकर याच पोलीस ठाण्याचे दुसरे एक तज्ज्ञ अधिकारी तर सध्या छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यात कार्यरत असतानाही मागे माजी पोलीस अधीक्षकांच्या काळात आठवड्यातील अर्धे दिवस नांदेडमध्येच ठाण मांडून असतात. त्यांचा दावा तर त्याहूनही भारी होता ! एसपी, अप्पर एसपी असो की डीवायएसपी, कोणाचीही बदली करून आणण्यात त्यांचा हातखंड’ असल्याचे ते मिरवतात होते. अर्थात, मागे एकदा अप्पर पोलीस अधीक्षकांना हिंगोलीला पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न सपशेल फसला होता, पण शेवटी मोठे लोक म्हणतात त्याप्रमाणे, प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. मागच्या वर्षीचा तोच पाळणा, तीच गाणी! गम्मत म्हणजे, या ज्योतिष्यांनी गेल्या वर्षी सुद्धा याच दिवसांत शहाजी उमाप यांची १४ ऑगस्टपर्यंत बदली होईल, असे जोरदार प्रसारण केले होते. आज त्या भविष्यवाणीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. उमाप साहेब अजूनही आपल्या जागेवर ठाम आहेत आणि हे भविष्यवेत्ते मात्र इकडून तिकडे हलवले गेले आहेत. जनतेची विनंती: यंदाचा मुहूर्त तरी सांगा! मागच्या वर्षीचे भाकीत तर फुसका फटाका निघाले, पण यंदाही हे महाशय पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. सर्वसामान्य जनतेला आता हीच उत्सुकता आहे की, यंदाच्या सोमवार ते गुरुवारच्या काळात कोणती आनंदाची बातमी येणार आहे? जर आपल्या मनात अशा काही सुप्त भावना लपलेल्या असतील, तर त्या कृपया प्रसिद्ध कराव्यात, जेणेकरून जनतेचे थोडे मनोरंजन होईल, अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्रालय जे काम करते, ते माहिती करून घेण्याची दैवी शक्ती सहायक पोलीस निरीक्षक पंढरिनाथ बोधनापाड/बोधनकर यांच्या कडे कोठून येते, हा आता नांदेडच्या पोलीस वर्तुळात थट्टेचा विषय ठरला आहे. संदर्भासाठी मागील वर्षाची बातमी .. 14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण Kanthak Suryatal Post Views: 1,176 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये महामोर्चा दिल्ली दरबारातील अस्वस्थता आणि मोदी-शाह युगापुढील सर्वात मोठे आव्हान!पाहूया आज संसदेत काय घडणार ?