नांदेड (प्रतिनिधी) – शहराच्या प्रगतीचे आणि दर्जेदार कामांचे गोडवे गाणाऱ्या प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना आज दुपारी १२ वाजता नंदीग्राम सोसायटीमधील कृष्णा चौकात घडली. अवघ्या काही दिवसांपूर्वीच नवा कोरा करण्यात आलेला रस्ता एका वाळूच्या ट्रकचा भार सोसू शकला नाही आणि तो थेट जमिनीच्या पोटात गडप झाला. विकासाचा खड्डा आणि गुत्तेदाराचे पाश काही दिवसांपूर्वीच ज्या रस्त्यावरून गुत्तेदार आणि यंत्रणेने विकासाची गंगा वाहिल्याचा दावा केला होता, तो रस्ता ट्रक खाली येताच पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. यावरून रस्ता तयार करणारा गुत्तेदार आणि तो मंजूर करून घेणारी यंत्रणा यांचे अर्थपूर्ण संबंध किती खोल आहेत, हे जनतेला उघडपणे दिसले. दिले-घेतले आणि पुन्हा पाळले याच तत्त्वावर हे काम झाले असल्याचे आता सिद्ध झाले आहे. विना-नंबरी वाळूचा रथ आणि प्रशासनाचे आशीर्वाद रस्त्यात फसलेल्या त्या ट्रकला समोरच्या बाजूला नंबर प्लेटच नव्हती, बहुधा ट्रकला कोणाची दृष्ट लागू नये किंवा तो अदृश्य राहावा, अशी व्यवस्था असावी. दिवसाढवळ्या वाळूची अवैध वाहतूक सुरू असताना प्रशासन नेमके कोठे विश्रांती घेत होते, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा सर्व काही बंद असल्याच्या बाता मारत असताना, ही वाळू कोणाच्या दैवी आशीर्वादाने रस्त्यावर धावत होती, हे एक मोठे गूढच आहे. अवैध धंद्यांचा त्रिवेणी संगम कृष्णा चौकातील या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा बांध फुटला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात केवळ वाळूच नाही, तर गुटखा आणि जुगाराचाही मोठा बाजार भरतो. मात्र, प्रशासनाचे लक्ष याकडे न जाता केवळ रस्ते उखडून टाकण्यावर आणि जनतेचा पैसा खड्ड्यात घालण्यावरच असल्याचे दिसते. जनतेचा सवाल: चौकशी होणार की फक्त वाळू सांडणार? रस्ता उखडला, वाळू सांडली आणि व्हिडिओही व्हायरल झाले. आता प्रशासन फक्त रस्ता दुरुस्त करण्याची ‘तप्तरता’ दाखवणार की त्या दोषी गुत्तेदारावर आणि वाळू माफियांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार? की पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वीच रस्ता झाला होता असे रडगाणे गाऊन भ्रष्टाचार ढोपून ठेवणार? असे अनेक प्रश्न नांदेडकरांच्या मनात उपस्थित होत आहेत. दिवसा ढवळ्या अवैध्य वाळू वाहतूक या घटनेने आणखी एक मुद्दा समोर आला आहे की,या वाळूच्या ट्रकवर समोरच्या बाजूचा नोंदणी क्रमांक अर्धवट दिसत आहे. म्हणजे चुकीचे काम करणारेच असे करतात असे जनता बोलत आहे. मग पोलीस प्रशासनाने यावर काही कार्यवाही केली काय असा प्रश्न विचारला जात आहे. वाळू परवान्याची होती की नाही याची तपासणी कोण करणार?एकीकडे नांदेड जिल्ह्यात अवैध्य वाळू व्यवसाय बंद असल्याचे सांगितले जाई पण आजच्या ट्रक मधील वाळू कायदेशीर होती काय याची माहिती कोण घेणार? कोणाची जबाबदारी आहे ती?हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलीस विभागाची स्थानिक गुन्हे शाखा काय करीत आहे मग?७०० मोदकांचा एक किस्सा सुरु आहे. तसेच या ट्र्क बाबत होणार काय?याची शंका घेतली जात आहे. संबंधित व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-06-at-16.09.45.mp4 Kanthak Suryatal Post Views: 621 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या? मोदींच्या सत्तेच्या गणितात बिघाड: बंगालच्या २० खासदारांचा डाव नियतीनेच उलटवला! सदस्यत्वावर टांगती तलवार?