राणीसावरगाव (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव येथील संगीत विभागाच्या वतीने आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ज्ञान भक्ती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात नवोदित कलाकारांनी सादर केलेल्या अभंग व भक्तीगीत गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. तसेच डॉ. दिपाली चंद्रकांत पांडे–देशमुख लिखित प्रवास तिच्या समृद्धीचा या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या दळणर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास बोन्नर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या संचालिका सौ. शिवानीताई दळणर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. चेतन पांडे व प्रा. सारिका पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात कौशिकी पांडे, ऋग्वेद अपस्तंब, नेहा सुरवसे व कल्याणी टाकळकर व वैजनाथ मुरडे या नवोदित कलाकारांनी विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेले अभंग व भक्तीगीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. चेतन पांडे (तबला), अमोल लाकडे (पखवाज) आणि मिहीर जोशी (संवादिनी) यांनी उत्कृष्ट साथसंगत करून गायनाला चार चाँद लावले. यावेळी मान्यवरांनी ज्ञान, भक्ती आणि संस्कार यांचा संगम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतो असे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रवास तिच्या समृद्धीचा या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.पुस्तकाच्या माध्यमातून विविध कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात आला असून, डॉ . संतोष हंकारे यांनी या पुस्तकाबद्दल आपले मत मांडले.हा ग्रंथ समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयाच्या संगीत विभागाने कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले. या कार्यक्रमाचे संचलन डॉ.बंग यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वच प्राध्यापक वृंदांचे सहकार्य लाभले.विद्यार्थी, प्राध्यापक, पालक व रसिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. ज्ञानातून संस्कार, भक्तीतून समरसता आणि संगीतातून संस्कृतीचा जागर हा कार्यक्रमाचा संदेश उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला. Kanthak Suryatal Post Views: 382 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शंकर विद्यालयात घुमला विठुनामाचा गजर शिक्षक और गुरु में बहुत बड़ा अंतर है।