नांदेड (प्रतिनिधी) -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील सराफा भागातील नगरेश्वर प्राथमिक शाळेत युवा सेनेचे गणेश पेन्सिलवार यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नगरेश्वर प्राथमिक शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी विद्यार्थ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज पासून ते बाळासाहेब ठाकरे पर्यंत यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील दाचावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे. बालाजी कल्याणकर. सचिन पाटील. युवासेना तालुकाप्रमुख अशोक पावडे. डॉक्टर देवकते. उपशहर प्रमुख खाजाबाई. प्रमोद सावंत. कामगार सेनेचे मनीष झगडे. मंदार जोशी. गौरव यादव. सनी परदेशी. अक्षय यादव यांच्यासह शाळेतील सहशिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पवन मामीडवार यांनी केले .आभार प्रदर्शन गणेश पेन्सिलवार यांनी करून नगरेश्वर शैक्षणिक संस्था सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहते असे संयोजकांनी म्हटले. Kanthak Suryatal Post Views: 606 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड – 1956 का कानून क्यों नहीं बदला जाना चाहिए? आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षा मोहिम अधिक प्रभावी