नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी दुपारी फिर्यादी वाजीद अली अहमद अली हे ऑटोस्टँड परिसरात खरेदीसाठी पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी झटापट करून शर्टच्या खिशातील सुमारे 1,700 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले व घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी गुन्हेशोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले.तेव्हा गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षकसुनीलबुलंगे,पोलीसअंमलदारमठपती,चूस,सातपुते,सुरनर, आरदवड,शेळके,कदम,धूमाळ,पावडे,राठोड,बावरी,पोकळे,पठाण,गच्चे, क्षिरसागर आणि चाटे यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रणजितसिंग उर्फ बच्चूसिंग सतनामसिंग बावरी व सय्यद सलमान सय्यद बाबूमियाँ या दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल ही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, बाजारपेठ, बसस्थानके व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती अथवा घटना आढळल्यास तातडीने पोलीस किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी पकडल्यावर काय झाले .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-19-at-21.17.46.mp4 या घटनेचे एका व्यक्तीने चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले. भर बाजारात हा प्रकार घडला पण कोणाची हिंमत झाली नाही त्या दरोडेखोरांना प्रतिकार करण्याची हि बाजू मात्र समाजाने विचार करण्यासारखी आहे.समाजात समाज हिंमत करणार नाही ते अश्या घटना घडत राहणारच. संबंधित व्हिडीओ … https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-19-at-09.17.23.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-19-at-09.17.23-1.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,115 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मी मुख्यमंत्री नसतो तर… – मोदींचे ते शब्द आणिआजचे जंतरमंतरचे वास्तव! अर्धापूरात घरफोडी; घरातून ३५ हजारांची रोकड लंपास