अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर व श्रीकांत सुभाष जानकर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत समर्थ यांनी ५२० गुण घेऊन तर श्रीकांत जानकर यांनी ५६३ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. बादोल्यासारख्या ग्रामीण भागातील एका सर्व सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या या दोन्ही जानकर बंधुनी बादोले गावचे नाव तालुक्यात झळकाविले असून त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यानी अभिनंदनाचा वर्षाव तसेच कौतुक केले आहे. एकाच घरातील दोन बंधू एकाचवेळेस नीट परीक्षेत यश मिळविण्याची किमया त्यांनी केले आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या आई आणि वडीलांना अत्यानंद झाला आहे. कठोर परीश्रम, वेळेचे बंधन, ध्येय, जिद्द, चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगितले. आजच्या तरुणांनी मोबाईलकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करुन आपल्या आई वडीलांचे तसेच कुटुंबाचे नाव लौकिक करावे असे आवाहन श्रीकांत व समर्थ जानकर यांनी केले.
More Related Articles
जिल्हा बॅंकेच्या ग्राहकांसाठी क्युआर कोडची सुविधा- माजी मंत्री खतगावकर
562 कोटीपैकी 428 कोटी कर्जाची वसुली नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंंकेने बॅंकींग क्षेत्रात डिजिटल क्षेत्रात…
विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद ; प्रभाग व ग्रामसंघाला जागा उपलब्ध करणार
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड – मराठवाडा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ‘संवाद मराठवाड्याशी’ या…
कुंडलवाडी पोलीसांनी 3 लाख 25 हजारांच्या गुटख्यासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी एका कारमध्ये अवैधरित्या जाणारा 3 लाख 25 हजार रुपयांचा गुटखा आणि सोबत कार,…
