औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) सोडून खूप वर्ष झाली होती.मी पूर्णवेळ आंबेडकरी नाट्य आणि साहित्यात रमलो होतो. चित्रपटात जाण्याबद्दल फारशी ओढ उरली नव्हती.मी माझ्या कामात खूष होतो आणि त्यात भरारीही घेत होतो.
माझे नाट्यशास्त्र विभागातील मित्र आजचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे आणि ‘ धर्मवीर ‘ ह्या सुपरहिट चित्रपटांचा अभिनेता मंगेश देसाई यांचं लक्षवेधी पदार्पण ठरलेलं पुरुषोत्तम बेर्डे लिखित,दिग्दर्शित नाटक ‘ जाऊबाई जोरात ‘ जोरात चाललं होतं.नांदेडला त्याचा प्रयोग होता.मी जवळपास पूर्ण परिवाराला सोबत घेऊन जायचं ठरवलं होतं.तिकिटे काढलेली.जाण्यापूर्वी क्लिनिकमध्ये बसलो होतो. घरच्यांना तयार राहायला सांगितलं होतं. डॉ. आंबेडकर नगर,नांदेड येथील शांतीलालजी भंडारी ह्यांच्या दुकानात हे क्लिनिक होतं.
मकरंद,मंगेश येणार…आपल्या मित्रांचं नाटक सगळ्यांना दाखवणं हा गौरवाचा भाग होता.पण…मी त्यांना भेटण्यासाठी फार उत्सुक नव्हतो कारण … त्यांनी ओळखलं नाही तर ? ही चिंताही.
संध्याकाळचे साडेसात वाजले असतील अचानक मला फोन…
” कोण बोलतंय ? ”
” विल्या, अबे मी मक्या. कुठे आहेस ? नाटकाला येत न्हाइस व्हय ? ”
मला आनंदाचा धक्का.
(आज मकरंद आणि मंगेशच्या यशाने आभाळाला गवसणी घातलीय पण त्यांच्या कुणाही मित्राने त्यांना मकरंद सर, मंगेशजी, मकरंद साहेब किंवा मंगेशराव अशी साद घातली की,त्यांच्याकडून ते बोलण्याआधीच दोनचार शिव्या हक्काने हासडणार आणि मग संवादाची गाडी ‘ हॅलो मक्या ‘ … ‘ हां बोल विल्या ‘ ह्या योग्य प्लॅटफॉर्मवर येते… अगदी आजपर्यंत. आमची अनिच्छा पण नाईलाज.)
” अरे, मी उत्सुकतेने तुमच्या भेटीसाठी नाटकाला निघालोय.”
” ते जाऊ दे तिकडं.तू आता कुठं आहेस ? तुला भेटायला मी आणि मंग्या येतोय.अवघ्या अर्ध्या एक तासात मेकअपला बसावं लागेल. तुला भेटायची खूप इच्छा आहे.”
मी खूष… माझा अंदाज चुकला म्हणून. साले हे दोघे तर आमच्यापेक्षा जमिनीवर आहेत.
” शिवाजीनगरला ओम हॉटेलवर या.”
मी आणि भंडारीजी दोघे हॉटेलवर.इथे भंडारी माझ्या क्लिनिकचे घरमालक आणि ओम हॉटेलही त्याच बंधूंचे.
आम्ही पोचलो.अवघ्या काही मिनिटात टी शर्ट, बरमुडे घालून पँटच्या बक्कलला पेजर लाऊन हे दोघे हजर.मी धावत जाऊन गळ्याला पडलो. तिघेही खूप आनंदी.
पण,आमच्यापेक्षा हॉटेलमधील ग्राहक खुष.भंडारी ब्रदर्स ह्यांच्या चेहऱ्यावर मी त्यांचा किरायेदार असल्याचा अभिमान झळकत होता. माझ्यासोबत माझा आतेभाऊ नंदू होता. माझ्या मित्रांसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते. गप्पा मारत,एकमेकांची ख्याली खुशाली विचारत त्यांनी गडबडीतच मसाला डोसा खाल्ला आणि चहा पिली.
बी. के हॉलमधून नाटकाचे मॅनेजर आणि निर्मिती सावंत ह्या दिग्गज अभिनेत्रीचे त्यांना फोन.नाटकाची वेळ होत आलेली.पण हे गप्पांमध्ये रंगलेले.मीच चिंतेत. हे वेळेवर पोचले नाही तर ?
” अरे जाऊ दे रे,नाटक रोजचच आहे.तू थोडाच रोज भेटतोस…” दोघेही गोष्टीवेल्हाळ आणि तेंव्हापासून ते आजपर्यंत अत्यंत नितळ मनाचे.
आम्ही तातडीने नाट्यगृहाकडे निघालो.
नाटकाला सुरुवात झाली. ह्यापूर्वी मकरंदने नानांच्या सहकाऱ्याने ‘ यशवंत ‘ चित्रपटात भूमिका केली होती…पण ती खूपच छोटी होती.
त्या मानाने माझ्या आठवणीप्रमाणे ‘ जाऊ बाई जोरात ‘ हे नाटक मक्या – मंग्या ह्या जोडीसाठी लक्षवेधी पदार्पण ठरलं होतं.
नाटक सुरू झालं. मक्या ड्रायव्हर आणि मंग्या कंडक्टर… दोनच पुरुष पात्र बाकी सगळ्याराजकारणी नेते,मंत्र्यांच्या बायकांच्या भूमिकेतील महिला.नाटक बघताना मी अभिमानाने फुलत होतो.
मध्यंतर झालं.ठरल्याप्रमाणे मी,आई,आक्का,बेबी आणि सगळे ग्रीन रुममध्ये गेलो. विनोदी दिग्गज कलाकार निर्मितीताई सावंत आणि सर्वांची प्रचंड धावपळ सुरू.तेवढ्यात मक्या मला घेऊन निर्मितीताईकडे गेला.आणि ” ताई, हा माझा जिवलग मित्र विल्या. डॉक्टर आहे.नांदेडला असतो.हा आमच्यासोबत नाट्यशास्त्र विभागात होता. जबरदस्त लेखक,दिग्दर्शक, अभिनेता आहे. त्याच्या ” आमचाबी पंधरा आगस्ट ” नाटकाने इतिहास घडवला.औरंगाबादची रंगभूमी खूप गाजवली त्यानं…पण दलिंदर आहे… मुंबईला यायचं सोडून इथं आलंय ” म्हणाला.
हे ऐकताच सगळ्या कलावंतांच्या नजरा माझ्याकडे वळल्या.मी ताईंच्या पाया पडलो. स्वाक्षरी घेतली.मग मी सर्वांना म्हणालो,” ही माझी आई.हिनेच मला घडवलं.” क्षणात निर्मितीताई आईच्या वाकून पाया पडल्या. आणि बघता बघता मक्या, मंग्या आणि सर्व महिला कलावंत आदराने आईच्या पाया पडल्या.
आजुबाजूला कलावंतांना भेटायला आलेले सगळे थक्क होऊन बघत होते.आईला तर आनंदाने काहीच सुचेना.बहिणींच्या डोळ्यांत माझ्याबद्दल अपार कौतुक !
मग नाटक संपल्यावर सर्वांचे मन भरून कौतुक आणि अभिनंदन करत आम्ही घरी परतलो.
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय चळवळींचे नेतृत्व करताना आईचा पैसा पाण्यासारखा उडवला.आज त्या पैशांचे सार्थक झाले असे आईला वाटत होतं.
आणि रात्रभर माझ्या डोळ्यात मात्र स्टार बनण्याच्या वेगवान प्रवासातही स्वतःमधील आई, वडिलांचे आदर्श संस्कार,विनम्रता, मैत्री जपण्याची जाणीव जपणारे माझे कॉलेज जीवनातील हे दोन मित्र जणू ठसठशीतपणे कोरल्या गेले होते. औरंगाबाद येथील युवक कलावंतांमध्ये जवळपास सर्वच स्पर्धात आपल्या वास्तववादी लेखन,दिग्दर्शन आणि अभिनयानं मी पहिल्या फळीतही अग्रेसर ठरलो होतो.तेंव्हा माझ्यासोबत टक्कर असायची ती प्रा . दिलीप महालिंगे सर,धनंजय सरदेशपांडे,कमलेश महाजन,आजचा सुपरस्टार लेखक अरविंद जगताप , प्रेषित जगताप,सुनील पाटील आदी लोकांसोबत…
खूप खूप विनयाने सांगतो, त्या १९९० ते १९९५ च्या काळात हे माझे आजचे सुपरस्टार मित्र पथनाट्य वगैरेमधून खूप गाजले.पण १९९० पासून मी सर्व एकांकिका स्पर्धा आणि युवक महोत्सवात जो अनेक वर्षे धुमाकुळ घातला होता…जवळपास २०२० पर्यंत तेही खेड्यातली चित्रकला महाविद्यालय,औरंगाबादची गरीब पोरं घेऊन… त्यामुळे त्याकाळचा युवक महोत्सवाचा सुपरस्टार मला म्हणायचे. नाट्यशास्त्र विभाग विद्यापीठ,सरस्वती भुवन महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय,एमजीएम महाविद्यालय ह्या आजपर्यंतच्या ज्यांना लोक अपराजित किंवा एकमेव असे समजत होते. तो भ्रम दूर करण्याचे काम माझ्याकडून घडले होते. तेही आंबेडकरी नाटके करून हे विशेष !
आणि माझ्याबद्दल माझ्या आजच्या सर्व सेलिब्रिटी मित्रांना अभिमान वाटतो त्याचे हेच कारण.
पण वारंवार स्पर्धेत तोंडावर आपटूनही ग्रामीण ओळख,जात, एकही दिग्गज महाविद्यालय पाठीशी नसणे ह्यामुळे इतर अनेक प्रस्थापितांना माझ्याबद्दल असूया वाटायची,अनेकजण अनुल्लेखाने मारायचे…
पण त्याच परिघातील हे दोन कोहिनूर हिरे आज सिनेमा क्षेत्रात माझ्यापेक्षा शेकडो मैल पुढे असूनही तेच प्रेम,तीच काळजी, तेच ऋणानुबंध जपतात…अगदी ह्या क्षणापर्यंत.
ह्यात माझे काहीच नाही…तर त्यांचे काळीज वाघांचे आहे.म्हणून माझ्यासहीत सर्व जुन्या मित्रांशी त्यांचे नाते अधिकच घट्ट आहे.
त्यांच्यासोबतच्या
इतर अनेक गोड,सोनेरी आठवणी आहेत. त्यातील काही पुढीलवेळी !

डॉ. विलासराज भद्रे
अमृत क्लिनिक,नांदेड (महाराष्ट्र )
M : 9890145726.