नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांत १०,६०४ पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत गुटखा आणि अंमली पदार्थांच्या एकूण ८० गुन्ह्यांची नोंद करून १ कोटी २७ लाख ४९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. गुटखा विक्रीप्रकरणी नांदेड जिल्ह्यात २०, परभणीत २३, हिंगोलीत १२ आणि लातूरमध्ये १२ असे एकूण ६७ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच गांजा विक्री, साठवणूक व वाहतुकीसंदर्भात नांदेडमध्ये ७, परभणीत ३ आणि लातूरमध्ये ३ असे १३ अंमली पदार्थांचे गुन्हे नोंदविण्यात आले. कारवाईदरम्यान गुटख्याचा १ कोटी १६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा तर अंमली पदार्थांचा ११ लाख १३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोहिमेत गुटखा प्रकरणात ९२ आणि अंमली पदार्थ प्रकरणात १९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, १ जुलैपासून अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून गुटखा, मटका, जुगार, दारू, अंमली पदार्थ, अवैध वाळू उपसा, वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘खबर’ हेल्पलाईनचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 754 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरातील लाखोंची चोरी उघड; मुलानेच मैत्रिणीच्या मदतीने रचला कट, ट्रॅक्टर चोरीचाही पर्दाफाश मार्च २०२३ पूर्वीच्या कार मालकांसाठी E20 इंधन हा एक मोठा धोका ठरू शकतो