नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या दोन पोलिसांवर पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी निलंबनाचा आसूड ओढला आहे. उमरी पोलीस ठाण्यातील या तडकाफडकी कारवाईमुळे अवैध कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले चालक आवेज सिद्धीकी आणि सुनील गोपाळराव कोलबुद्धे हे दोघे जनतेकडून पैसे स्वीकारत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ थेट पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहोचला. पुराव्यानिशी समोर आलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत अधीक्षकांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, डॉ.नीलाभ रोहन यांनी नांदेडचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, कोणत्याही प्रकारचा अवैध कारभार करू नका आणि जनतेला नाहक त्रास देऊ नका. मोदकांच्या नादी लागू नका (बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नका) असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, अधीक्षकांच्या या कडक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचारात मग्न असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता आपली पदे गमवावी लागली आहेत. या निलंबित कर्मचाऱ्यांची आता प्राथमिक चौकशी केली जाणार असून, त्यामध्ये तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कडक विभागीय चौकशीची कारवाई केली जाईल. वास्तव न्यूज लाईव्हने अशा चुकीच्या प्रकारांविरुद्ध नेहमीच भूमिका मांडली आहे. पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे पोलीस दलातील शिस्त आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी एक मोठा संदेश गेला आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,961 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation व्हॉट्सॲप युजरनेम फीचर: मोबाईल नंबरची गरज संपणार? जाणून घ्या सर्व काही राम माधव आणि माजी लष्करप्रमुख आयएसआयच्या भेटीला: कोलंबोत नक्की काय घडले?