हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हदगाव परिसरात नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजण्याच्या सुमारास गोळेगाव ते बेलमंडळ जाणाऱ्या रस्त्यालगत हदगाव येथे एका अज्ञात इसमाने नवजात स्त्री जातीचे अर्भक तसेच बालकाचा मृतदेह गुप्तपणे टाकून दिल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्तीने आपत्य जन्माची बाब लपविण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी सरकारतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिस अमलदार हुसेन माधव भिसे यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 194/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 93 व 94 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन बर्गे करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे. मृत बालकाची ओळख पटविण्यासाठी तसेच घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत Kanthak Suryatal Post Views: 726 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला; एक जखमी, आरोपी अटकेत जबरी चोरी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त