नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील नवीन मोंढा परिसरात एका युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कम हिसकावून 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास नवीन मोंढा परिसरात ही घटना घडली. आरोपी संतोष चांदू वाघमारे (रा. कामठा), सुमित देवानंद भन्डवाले (रा.पुयनी), जयसेन संजय चौंदते (रा.आंबेडकरनगर) व यश पाटील (रा. नुरी चौक) यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या साथीदाराला अडवले. फिर्यादी व साक्षीदार हे मोटारसायकलवरून जात असताना आरोपी दोन मोटारसायकलींवर येऊन त्यांच्या वाटेत उभे राहिले. आरोपींनी साक्षीदारास मारहाण करून त्याच्याकडील 1 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीस मोटारसायकलवर जबरदस्ती बसवून नेण्यात आले. आरोपींनी त्याला मारहाण करत फोन-पेद्वारे 700 रुपये उकळले तसेच 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पिंपळगाव (ता. नायगाव) येथील साईनाथ वसंत माने (वय 19) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 261/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 308, 309, 115(2), 351, 126(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करीत असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून जप्तीची कारवाईही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. Kanthak Suryatal Post Views: 1,824 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे निधन