नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 ते 30 जून, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून, त्याप्रमाणे परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या सहाव्या दिवशी, गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध (3) गुन्हे नोंदवत, या व्यवसायात गुंतलेल्या एकूण (3) आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. मोहिमेअंतर्गत, परिक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात (2) तर हिंगोली जिल्ह्यात (1) अशा एकूण (3) कारवाया करण्यात आल्या असून, यातील (3) आरोपींकडून 1,88,630/- रुपये किंमतीचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.उपरोक्त पदार्थांच्या संदर्भात, संबंधिताविरुद्ध कलम 123 बी.एन.एस. अन्वये कारवाई करण्यात आली असून, सदर कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा वर्षेपर्यंतच्या कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे. पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम : गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची पानटपऱ्यांवरून होणारी विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल दिवसभरात नांदेड परिक्षेत्रात एकूण (622) पान टपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, गुटख्यासोबतच अंमली पदार्थांच्या साठवणुकीची संभाव्य ठिकाणे देखील तपासण्यात येत आहेत. खबर हेल्पलाइन ला वाढता प्रतिसाद : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिक अवैध व्यवसायांची अचूक माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवत आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील गुटखा, अंमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी व आपल्या भागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 974 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ९९% न्यायव्यवस्था ही भीतीच्या सावटाखाली असतांना न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांच्या निर्णयाला सलाम अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिर दानपात्रातून करोडोंची चोरी पण अद्याप गुन्हा दाखल नाही