अर्धापूर (प्रतिनिधी) – येथील एका हॉटेलर दगडफेक करून दीड लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी १९ जणांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी अर्धापूर-नांदेड रस्त्यावरील वसमत फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. शहरातील शेख मुनिर शेख हैदर यांना व त्यांच्या दोन मुलांना जमावाने जुन्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या वसमत फाटा परिसरातील हॉटेल हैदरवर दगडफेक केली. विनापरवाना हॉटेलमध्ये प्रवेश करून टीव्ही, फ्रीज, खिडक्यांचे नुकसान केले. तसेच नामफलकाची तोडफोड करून दीड लाखाचे नुकसान केले. फिर्यादीच्या शेतमालकाच्या कारचे सुमारे ३० हजारांचे नुकसान केले, अशी फिर्याद शेख मुनिर यांनी दिली. अर्धापूर येथील मनसबखान बशीर खान,बाबर खान बशीर खान, आयूब खान महबूब खान, शायान खान आयूब खान, फैजान खान आयूब खान, अदिल खान मसूद खान,अजु खान मसूद खान,शोएब खान मनसब खान,मोईब खान मनसब खान,तला खान बाबर खान,मुक्तेदर खान सिकंदर खान,मुसबीर खान बशीर खान,आयान खान मसूद खान,साद खान तछू खान,असबाज खान आयूब खान.नावीद खान मसूद खान.जैद खान तछू खान,मुदस्सर खान सिकंदर खान,साकीब खान मनसब खान अश्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुरेश भोसले करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,658 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगरात घरफोडी; दीड लाखाच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला;ब्राम्हणवाडा येथून महिलेचे सोन्याचे एड चोरले हडकोत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा