नांदेड (प्रतिनिधी)- हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा ते धानोरा तांडा जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ मे २०२६ रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिला पायल विनोद उर्फ अर्जुन राठोड (रा. धारजनी फुलवाडी तांडा, ता. भोकर) असल्याचे समोर आले आहे. आरोपी विनोद उर्फ अर्जुन रंगराव राठोड (वय ३५, रा. धारजनी फुलवाडी तांडा, ता. भोकर) याने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात पायल राठोड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी शिवदास नारायण आडे (वय ५०, रा. बोरगडी तांडा, ता. हिमायतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगत हे करीत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,008 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी २५ हजारांचा मुद्देमाल जप्त शिवाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी नांदेड ग्रामीण हद्दीत वाळूचा टिपर पकडला