नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एका दिवसात तीन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून १७ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि चार दुचाकींसह एकूण ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे, ज्ञानेश्वर मठवाड,बाबुराव चव्हाण,पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,अर्जुन मुंढे,मारोती पंचलिंग,विनोद पवार,विष्णू कल्याणकर,संतोष पवार,असिफ अली,गवेंद्र सिरमलवार,जमीर अहेमद,हनुवता कदम,हणमंत तेलंग,शंकर माळगे,समीर अहेमद,सचिन चावरे यांनी केली. गोपनीय माहितीच्या आधारे गोकुळवाडी परिसर, विष्णुपुरी येथील बंद बायपास परिसर आणि मुगट परिसरात छापे टाकण्यात आले. या कारवाईत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत पवन बनकर, साईनाथ वडजे, परशुराम उबाळे, प्रवीण आनलदास, वैभव पुंजरवाड, राजेश सुतार, प्रदीप कानगुर्ले आणि अशोक शिंगणगुटे यांच्यासह अन्य आरोपींना पकडण्यात आले. दुसऱ्या कारवाईत सुरेश उर्फ सानू नामकीर, ओमकार शेख, हरीसिंग जपलसिंग, शेख आसिफ आणि शुभंकर हंबर्डे यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर तिसऱ्या कारवाईत मोहम्मद निसार मोहम्मद यासीन, मोहम्मद फारुख रफीक, फैसल चाऊस सलाम चाऊस आणि मोहम्मद अकबर शेख बाबू यांना जुगार खेळताना पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली जप्त केल्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांनी १ मेपासून आतापर्यंत अवैध जुगार व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबवून १२ गुन्हे दाखल केले असून, एकूण ५० आरोपींवर कारवाई करत १८ लाख ५७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,289 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या फसवणूक प्रकरणांत 70 लाखांचा गंडा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी