नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणांत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, संबंधित आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओंकार इंडस्ट्रीज एमआयडीसी परिसरात 29 एप्रिल ते 9 मे 2026 दरम्यान ही घटना घडली. आरोपी इक्बाल हाजी गफार गोंडवाला (रा. अकोला), मोहम्मद इरफान (रा. उत्तरप्रदेश), रोहित ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक, सुरेश यादव (रा. मुंबई) व इतर इसमांनी संगनमत करून फिर्यादी अशोक प्रल्हाद बागल (वय 40, रा. काकांडी, ता. जि. नांदेड) यांच्याकडून खाद्यतेल खरेदीसाठी 35 लाख 73 हजार 570 रुपये घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे माल न देता रिकामे टँकर पाठवून विश्वासघात व फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 543/2026 अंतर्गत बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि/नाईक करीत आहेत. दुसऱ्या प्रकरणात, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरंगा चौक परिसरात 18 फेब्रुवारी 2026 रोजी जमीन व्यवहाराच्या आमिषाने 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. आरोपी राहुल नागोराव गायकवाड (रा. शिवराय नगर, नांदेड), विशाल गोविंदराव गायकवाड (रा. सिडको, नांदेड) व माणिक उर्फ बाबु दत्ता सरोदे (रा. नांदेड) यांनी संगनमत करून अनेक व्यक्तींना सोदाविरहित जमीन असल्याचे भासवून व्यवहार केला. फिर्यादी देवेंद्र शांतिलाल शर्मा (वय 39, रा. दिलीपसिंग कॉलनी, गायत्री नगर, कोटा, नांदेड) यांच्याकडून 35 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 226/2026 दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 945 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केला तीन जुगार अड्ड्यांवर छापे; १७ आरोपींना ताब्यात; ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त