नांदेड: -नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी धडक मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच आठवड्यात ३३५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ कोटी २० लाख ९१ हजार ९४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री, शस्त्र अधिनियम व इतर अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ मे ते ७ मे या कालावधीत नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत गुटखा व्यवसायाविरोधात ७ गुन्हे, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ८२ गुन्हे, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १९६ गुन्हे, तर शस्त्र अधिनियमांतर्गत १९ आणि इतर कायद्यांन्वये ३१ गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ४७० आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. जिल्हानिहाय पाहता, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया झाल्या असून, गुटखा, मटका-जुगार, दारू व शस्त्र अधिनियमांतर्गत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांतही पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर छापेमारी करून आरोपींना ताब्यात घेतले. या मोहिमेत दारूबंदी कायद्यांतर्गत सर्वाधिक १९६ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये २९ लाख ३५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमांतर्गत ४५ लाखांहून अधिक किंमतीची शस्त्रे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांनी “खबर” हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती ९१ ५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 550 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड अभिव्यक्त संघ निवडणूक : मतदान उत्साहात पार सेना अधिकारी अपमान मामला: सुप्रीम कोर्ट की सख्ती और मंत्री विजय शाह की कुर्सी जाना लगभग तय