नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील अभिव्यक्त संघाच्या विविध पदांसाठी आज घेण्यात आलेली निवडणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच इतर पदांसाठी मतदान प्रक्रिया दिवसभर सुरळीत सुरू होती. या निवडणुकीसाठी एकूण २५४४ मतदार नोंदणीकृत असून त्यापैकी १७८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.अनिल पाटील यांनी दिली.ही मतदान टक्केवारी ७०.०४ झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर सदस्यांची गर्दी पाहायला मिळाली. अध्यक्षपदासाठी अॅड. यदुपत अर्धापुरकर, अॅड.जगजीवन भेदे, अॅड. भाऊसाहेब देशमुख यांच्यासह विविध पदांचे उमेदवार मतदान केंद्र परिसरात उपस्थित राहून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत होते. दरम्यान, काहीजण मतदान कक्षात उभे राहून मतदारांना मार्गदर्शन करत असल्याचे आढळून आले. यावर निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.अनिल पाटील यांनी त्यावर आक्षेप घेत संबंधित व्यक्तीस तात्काळ मतदान केंद्राबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या.तेव्हाच तो बाहेर निघाला. सायंकाळी ६.३० वाजता मतदान प्रक्रिया समाप्त झाली. या निवडणुकीतील मतमोजणी सोमवार, दि. ११ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. अनिल पाटील यांनी दिली. Kanthak Suryatal Post Views: 648 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अलफिया खानम हिचे दहावी परीक्षेत यश. इकरा उर्दू हायस्कूल मध्ये दुसरा क्रमांक मिळवित घेतले 87 टक्के गुण नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम ;आठवडाभरात ३३५ गुन्हे दाखल; २ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त