नांदेड – कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील कु. गजेश्री व्यंकटराव गोरे यांची आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कनिष्ठ सहायक या पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS Certificate) प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करुन घेवून त्यांना 10 मार्च 2026 पर्यंत नियुक्ती द्यावयाची होती. संबंधित महसुल सहायक माधव हरी फुलवळे यांनी 23 मार्च 2026 रोजी मुदत संपल्यावर पडताळणी अहवाल सादर केला. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महसूल सहायक माधव हरी फुलवळे यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद नांदेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो पडताळणीसाठी 23 सप्टेंबर 2025 रोजी कंधार तहसिलदार यांना पाठविण्यात आला होता. या तहसिल कार्यालयातील महसुल सहायक माधव हरी फुलवळे यांनी 23 मार्च 2026 रोजी तो पडताळणी अहवाल सादर केला. परंतू या उमेदवाराच्या भरती प्रक्रियेची मुदत ही 10 मार्च 2026 रोजी संपुष्टात आल्यामुळे कु. गजेश्री गोरे यांना शासकिय नोकरी मिळण्यास अडचण निर्माण झाली. ही बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेत संबंधित महसूल सहायक माधव हरी फुलवळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांना शासन सेवेतून निलंबित केले. Kanthak Suryatal Post Views: 502 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सहाव्या दिवशी 49 गुन्हे दाखल; 63 इसमांवर कारवाई, 32 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त पश्चिम बंगालमधील निवडणूक-उत्तर हिंसाचार: लोकशाहीची पायमल्ली आणि जंगलराजचा धोका;ममता बॅनर्जीला फसवण्याचा डाव