खुनाचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नांदेड (प्रतिनिधी)- खुनाचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी आरोपीस दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी घडलेल्या घटनेत आरोपी रामदास विठ्ठल शिंदे (वय ४७, रा. धानोरा, ता. हदगाव) याने फिर्यादीवर मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक संगीता कदम यांनी केला होता. पोलीसांनी तपास करून भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहमद अब्बास यांनी प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने सादर पुरावे ग्राह्य धरत आरोपीस दोषी ठरवून ७ वर्षे सक्तमजुरी तसेच १०,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!