नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद नांदेड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना कर्तव्यात कसूर तसेच विविध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे राज्य शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने डॉ. देशमुख यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे. निलंबन कालावधीत डॉ. संगीता देशमुख यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, परभणी येथे निश्चित करण्यात आले असून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांना कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यवसाय अथवा उद्योगधंद्यात सहभाग घेता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही शासनाने दिला आहे. निलंबन कालावधीत लागू असलेल्या नियमांनुसार त्यांना निर्वाहभत्ता व इतर अनुज्ञेय भत्ते देण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,144 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सट्टेबाजाला घराचे कुलूप तोडून केले जेरबंद नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा;विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल