नांदेड – दिनांक ३, ४ व ५ एप्रिल २०२६ दरम्यान परभणी येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने तब्बल ३५५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपली परंपरा कायम राखली. जालना जिल्हा २२१ गुणांसह द्वितीय, तर आयोजक परभणी जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला. नांदेड जिल्ह्यातील १९८ खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेत, तर ४२ कलाकारांनी सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला. सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल व ४×१०० रिले (पुरुष) मध्ये प्रथम क्रमांक मिळवत नांदेडने दमदार कामगिरी केली. तसेच खो-खो (पुरुष), ४×५० जलतरण रिले, संचलन, ४×१०० व ४×४०० रिले (महिला) मध्ये द्वितीय, तर टर्फ क्रिकेट (महिला), खो-खो (महिला) व जलतरण ४×५० रिले मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक क्रीडा प्रकारातही नांदेडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, धावणे, लांब उडी, थाळी फेक, बुद्धिबळ, कॅरम आदी विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले. इतर अनेक प्रकारात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत जिल्ह्याने आपले अव्वल स्थान अधिक बळकट केले. सांस्कृतिक स्पर्धेतही नांदेड जिल्ह्याची कामगिरी तितकीच उल्लेखनीय ठरली. एकूण १५ कलाप्रकारांपैकी १२ प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत जिल्ह्याने सांस्कृतिक विभागातही प्रथम क्रमांक मिळवला. उत्कृष्ट निर्मितीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, तर उत्कृष्ट निवेदनासाठी डॉ. रत्नदीप गायकवाड व छाया नागर्थवार यांना प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे, वैयक्तिक गायन स्पर्धेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय युगल नृत्य, समूह नृत्य व दंडार या आदिवासी लोककलेलाही प्रथम क्रमांक मिळाला. प्रियंका पवार–कर्डिले यांच्या समूह गायन चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले. ‘झाशीची राणी’ या एकपात्री अभिनयासाठी डॉ. प्रणिता काळे, तसेच मीना सोलापुरे व परमेश्वर वारे यांच्या युगल गायनाला द्वितीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक नृत्य प्रकारात धम्मदिना हनवते यांच्या लावणीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी नांदेड डॉ.सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार – कर्डिले, संतोषी देवकुळे, प्रवीण मेंगशेट्टी, अविनाश कांबळे, क्रांती डोंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्यासह इतर सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, शिपाई व महसूल सेवक तसेच महसूल संघटनांचे विविध पदाधिकारी लक्ष्मण नरमवार, मुगाजी काकडे, उदयकुमार मिसाळे, संजय नागमवाड, गिरीश येवते, नन्हू कानगुले, मधुकर वाठोरे, विश्वांभर जोंधळे, सुधाकर डोईवाड इ. नी परिश्रम घेतले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा हया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. Kanthak Suryatal Post Views: 527 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख निलंबित मोजतबा अली खामनेई समोर डोनाल्ड ट्रॅप सरेंडर