नांदेड – लिटल स्टार पब्लिक स्कूल, प्रि-प्रायमरी गणेशनगर रोड, नांदेड यांचा दि. ५ एप्रिल २०२६ रोजी वयोगट ३ ते ६ वर्ष या विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्द व चालू घडामोडी प्रश्नांची स्पर्धा घेण्यात आली. (वर्षभर विविध स्पर्धा शाळेमध्ये मुलांसाठी आयोजित करण्यात येतात.) विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे हा उपक्रम २०१५ पासून घेण्यात येत आहे. त्यामुळे मुलांची स्पर्धेबद्दलची आवड निर्माण होते व भिती कमी होते. व सर्व मुले उत्साहाने सहभागी होतात. त्यासाठी शिक्षक व पालक मुलांची तयारी करुन घेतात असे शाळेच्या प्रिंसीपल सौ. सुनंदा एडके मॅडम बोलत होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून हेडकॉन्स्टेबल मानव तस्करी विभाग, एस.पी. ऑफिस नांदेड येथील श्री अच्युतराव मोरे तर एम.एस.डब्ल्यु. फॅसिलेटर अदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईच्या सौ. सुचित्रा भगत ह्या होत्या. तसेच शाळेच्या शिक्षीका स्वाती कदम मीस, आम्रपाली मीस, स्वाती मीस, आम्रपाली बाई यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. Kanthak Suryatal Post Views: 580 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला