नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात. जिल्ह्यात समाजकंटका सोबत रेती माफिया. सट्टावाले. जुगार वाले. आयपीएल वाले.मटका वाले. गुटखा वाले. यांचा वावर वाढल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले त्यामुळे नांदेड पोलिसांनी तात्काळ सर्च अँड शूट ऑपरेशन करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारावार यांनी केली. जिल्ह्यात व शहरात गोळीबार. हत्या. लुटमार. आदी घटना घडत असताना राजकीय वरद हस्ताने आयपीएलचा सट्टा. जुगार. मटका. गुटखा. अवैध धंद्यांचा महापूर आला असून नांदेड जिल्ह्यात आश्चर्याची बाब म्हणजे चक्क दोन तालुक्यातील नगराध्यक्ष अवैध धंद्या चालवत असेल तर सामान्य जनतेने बोंब मारावी का? असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारावार यांनी व्यक्त केला. रेती माफिया यांनी तर नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ घातले असून प्रशासन निव्वळ तरफे जाळून. बोटी जप्त करून थातूरमातूर कारवाई न करता रेती माफियावर एमपीडीए कायदा लागू करावी . लाल रेती मध्ये करोडांचा भ्रष्टाचार असून प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोर अवैद्यरीत्या कर्नाटकात रोजच्या शेकडो गाड्या रवाना होत आहेत. एकंदरीत नांदेड शहर व नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांचा वावर मोठ्या प्रमाणात चालू झाला असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्च अँड शूट ऑपरेशन तात्काळ करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारावार यांनी केली. Kanthak Suryatal Post Views: 1,318 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परभणी रेल्वे स्थानकावर RPF जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला;तर दुसऱ्या घटनेत सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश