नांदेड – एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एमबीए /एमएमएस-सीईटी-2026 आणि अभियांत्रिक, औषधनिर्माणशास्त्र, बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी परीक्षा-2026 दोन टप्प्यात नांदेड शहरात 6 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं. 6.45 वाजेपर्यत व 9 ते 19 मे 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत 3 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काढले आहेत. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पंचशिलनगर, तिरुमला हॉस्पीटल, छत्रपती चौक, नांदेड, शासकीय तंत्रनिकेतन वीर सावरकर मार्ग बाबानगर, नांदेड, श्री. संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी, शामल एज्युकेशन कॅम्प देगाव रोङ पो. नांदला डिग्रस खडकुत या 3 या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात दिनांक 6 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते 6.45 वाजेपर्यत व 9 ते 19 मे 2026 पर्यत सकाळी 7.30 ते सायं. 6.45वाजेपर्यतच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटरपर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रास नेण्यास, त्याचप्रमाणे परीक्षा कालावधीत या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 699 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सर्च अँड शूट ऑपरेशन नांदेड पोलिसांनी करावी – प्रकाश मारावार महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती रात्री आगमन नांदेड विश्रामगृहात आणि १० एप्रिल पर्यंत मुक्काम