उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील दिल्ली किशनगंज स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनेल बसविणे व यार्ड पुनर्रचना कामे करण्यात येत आहेत. या महत्त्वाच्या पायाभूत कामांच्या अनुषंगाने इंटरलॉकिंग ब्लॉक आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यानुसार 05 मे 2026 ते 10 मे 2026 या कालावधीत BNI ब्लॉक (6 दिवस) आणि 11 मे 2026 ते 13 मे 2026 या कालावधीत NI ब्लॉक (3 दिवस) घेण्यात येणार आहे. या कामांमुळे नांदेडहून धावणाऱ्या काही गाड्यांचे मार्गांतर (Diversion) करण्यात येणार असून काही स्थानकांवरील थांबे तात्पुरते रद्द राहतील. गाड्यांचे मार्गांतर गाडी क्र. 12485 नांदेड – श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 04 मे, 07 मे व 11 मे 2026 रोजी ओखला – लाजपत नगर – पटेल नगर – दिल्ली सराय रोहिल्ला मार्गे वळविण्यात येईल. या कालावधीत नवी दिल्ली (NDLS) येथे गाडीचा थांबा राहणार नाही. त्याऐवजी दिल्ली सफदरजंग (DSJ) येथे पर्यायी थांबा देण्यात येईल. गाडी क्र. 12421 नांदेड – अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 06 मे 2026 रोजी ओखला – लाजपत नगर – पटेल नगर – दिल्ली सराय रोहिल्ला मार्गे वळविण्यात येईल. या दिवशी नवी दिल्ली (NDLS) येथील थांबा रद्द राहील व दिल्ली सफदरजंग (DSJ) येथे पर्यायी थांबा देण्यात येईल. तसेच गाडी क्र. 12439 नांदेड – श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 10 मे 2026 रोजी ओखला – लाजपत नगर – पटेल नगर – दिल्ली सराय रोहिल्ला मार्गे वळविण्यात येईल. या दिवशी नवी दिल्ली (NDLS) येथील थांबा रद्द राहील व दिल्ली सफदरजंग (DSJ) येथे पर्यायी थांबा देण्यात येईल. या सर्व गाड्यांचा दिल्ली सफदरजंग (DSJ) येथील थांबा सकाळी 09:50 ते 09:55 या वेळेत असेल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे संचालन अधिक सुरक्षित व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दक्षिण मध्य रेल्वेला खेद असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 761 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation …. अखेर सोनू कल्याणकरचा खून ; रोहित लोट भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात एलसीबी सोडण्यासाठी विनंती अर्ज करून तालुका पोलीस ठाणे किंवा शांत जिल्ह्यात जा – बैठकीतील गप्पा टप्पा