नांदेड (प्रतिनिधी)- शहरात सलग तिसऱ्या दिवशी रक्तरंजित घटनांची मालिका सुरूच असून अवघ्या ७० तासांत तब्बल पाच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे सूर्योदयाच्या काही वेळ अगोदर श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कुमार दुकानाशेजारी असलेल्या गल्लीत सोनू कल्याणकर या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हत्येची क्रूरता पाहून परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव.पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी रात्री तिहेरी हत्याकांड घडले, त्यानंतर काल आणखी एका युवकाचा खून झाला आणि आज पहाटे पाचवी हत्या घडल्याने नांदेडमध्ये सुरू असलेली खुनांची ही मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे. मृत सोनू कल्याणकर हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा सुपुत्र असल्याची माहिती समोर आली आहे. गोलू मंगनाळे नावाच्या व्यक्तीसोबत त्याचे जुने वाद असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू असून ही हत्या त्याच पार्श्वभूमीवर झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सलग घडणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमुळे नांदेड शहरातील कायदा-सुव्यवस्था यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार कल्याणकर कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहे. अनिकेत उर्फ सोनू अशोक कल्याणकर (वय २६) रा. श्रीनगर नांदेड याच्या खून प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी रोहित लोट नावाचा युवक ताब्यात घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अजून कोणी या खून प्रकरणात भागीदार आहेत काय याचा शोध सुरु आहे. सोनू कल्याणकारचा संशयित मारेकरी रोहित लोट रा. गोवर्धन घाट नांदेडचे छायाचित्र .. Kanthak Suryatal Post Views: 11,931 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड; देखभाल कर्मचाऱ्यावर हल्ला दिल्ली किशनगंज स्थानकावर यार्ड पुनर्रचना कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते मार्गांतर