पुंडलिक तरटे यांचे निधन

बिलोली : तालुक्यातील केरूर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक मरिबा तरटे यांचे आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते सत्तर वर्षांचे होते.
दिवंगत पुंडलिक तरटे यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजता केरुर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलं , एक मुलगी , सुना, जावई , नातवंड असा परिवार आहे . भारतीय बौद्ध महासभेचे बिलोली तालुका अध्यक्ष धम्मपाल तरटे यांचे ते वडील होत तर पत्रकार राम तरटे यांचे ते चुलते होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!