शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड पोलीस परिक्षेत्राला राज्यात ए गव्हर्नस मिळवला पहिला नंबर नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ गव्हर्नन्स कार्यक्रमातील प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा आज मुंबई मध्ये सह्याद्री अतिथिगृह येथे सन्मान केला. या प्रसंगी राज्याचे मंत्री आशिष शेलार आणि निलेश राणे यांची उपस्थिती होती. जलद, पारदर्शक, कमी खर्चिक आणि नागरिकाभिमुख वेगवान, पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकांसाठी अधिक सोयीचे असते इ गव्हर्नन्स. नांदेड पोलीस परिक्षेत्रात नांदेड,हिंगोली,परभणी आणि लातूर हे चार जिल्हे समाविष्ठ आहेत. या चार जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस दलाचा या विजयात मोठा वाटा आहे. शहाजी उमाप यांचा पाठपुरावा करण्याची पद्धत या विजयाची शिल्पकार आहे. पोलीस विभाग खालील कामे इ गव्हर्नस या कार्यक्रमा दरम्यान करतात. १. ऑनलाइन गुन्हे नोंदणी (Online FIR) नागरिकांना ऑनलाइन FIR दाखल करण्याची सुविधा हरवलेले मोबाईल, कागदपत्रे यांची ऑनलाइन तक्रार पोलीस स्टेशनला न जाता तक्रार नोंदवता येते २. गुन्हे व गुन्हेगारांची डिजिटल माहिती गुन्हेगारांचा डेटा संगणकीकृत ठेवणे राज्य व देशभरातील माहिती एकत्र जोडणे Crime and Criminal Tracking Network & Systems (CCTNS) प्रणालीद्वारे माहिती शेअरिंग ३. नागरिक सेवा ऑनलाइन पोलीस व्हेरिफिकेशन (पासपोर्ट / नोकरी) कॅरेक्टर सर्टिफिकेट अर्ज भाडेकरू व नोकर नोंदणी कार्यक्रम परवानगी अर्ज ४. वाहतूक व्यवस्थापन (Traffic Management) ई-चलन (E-Challan) प्रणाली वाहतूक नियमभंगाची डिजिटल नोंद CCTV व स्मार्ट सिग्नल नियंत्रण ५. आपत्कालीन प्रतिसाद सेवा हेल्पलाइन नंबर व मोबाइल अॅप सेवा त्वरित मदत व लोकेशन ट्रॅकिंग महिला सुरक्षा अॅप्स व SOS सुविधा ६. कागदविरहित पोलीस प्रशासन केस डायरी डिजिटल स्वरूपात ऑनलाइन फाइल व्यवस्थापन अहवाल व तपास प्रक्रिया संगणकीकृत ७. नागरिक-पोलीस संवाद वाढवणे सोशल मीडिया द्वारे सूचना हरवलेले व्यक्ती शोध मोहीम सार्वजनिक माहिती व जनजागृती ८. राज्यस्तरीय डिजिटल पोलीस सेवा Maharashtra Police मार्फत ऑनलाइन सेवा पोर्टल तक्रार स्थिती तपासण्याची सुविधा पारदर्शक व जलद सेवा वितरण Kanthak Suryatal Post Views: 847 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे पकडली;पाच जण गजाआड