नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने माणसाच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.45 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर लाईन मध्ये घडली. या प्रकरणी फिर्यादी गोविंद मुन्नालाल परीवाले (वय 53, रा. गोकुळनगर, नांदेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 84 हजार 475 रुपयांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून नेली. या घटनेप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 132/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार येमेकर करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,053 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पुंडलिक तरटे यांचे निधन नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख