नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहराजवळील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ११.४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना ‘खबर’ हेल्पलाइनवरून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. २७ मार्च रोजी गाडेगाव रोडवरील कामठा परिसरात जगनलाल देविलाल यादव यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या टिनशेडमध्ये ‘पपलू’ नावाचा जुगार खेळ सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून आरोपींकडून १,५०,९५० रुपये रोख, ३७ मोबाईल फोन आणि १२ मोटारसायकली असा एकूण ११,४७,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार या ठिकाणी जुगार खेळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही समोर आले आहे. राज कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ या संस्थेमार्फत अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्रे विविध ठिकाणी चालवली जात असल्याची माहिती असून यापूर्वी परभणी जिल्ह्यातही अशाच केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारचे जुगार अड्डे अथवा प्रशिक्षण केंद्र आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,कामाजी गवळी,गणेश धुमाळ,संजीव जिंकलवाड यांचा सहभाग होता. या धाड प्रकरणात प्राप्त झालेल्या माहितीनुसार .. 1 गोविंद प्रतापसिंह चौहान गाडेगाव नांदेड, विमानतळ, नांदेड, महाराष्ट्र, भारत 2 शुभम प्रभाकर ठाकूर गाडेगाव नांदेड, विमानतळ, नांदेड, महाराष्ट्र, भारत 3 गुणवंत उर्फ सानू जगन्नाथ ठाकूर गाडेगाव ता. नांदेड, विमानतळ, नांदेड, महाराष्ट्र 4 आकाश राजेश पलनाडे जुना कोठा नांदेड, विमानतळ, नांदेड, महाराष्ट्र, भारत 5 शेख रफीक शेख मनीर आसरानगर, विमानतळ, नांदेड, महाराष्ट्र, भारत 6 नावेद अब्दुलहमीद पाथान आसरानगर, विमानतळ, नांदेड, महाराष्ट्र, भारत 7 इरफान मोहम्मद नुरी प्रियदर्शिनी नगर, लोटस जिनिंग, नांदेड 8 सुरेश नामदेव बाहारे एकलव्य ता. नांदेड, विमानतळ, नांदेड 9 भिकारी देविदास पगारे नांदेड नगर, नांदेड, विमानतळ, नांदेड 10 शिवा जनार्दन ठाकूर हडको कॉलनी, नांदेड, विमानतळ, नांदेड 11 जावेद अहमद मि. रहमतुल्ला खान फैसल पकवांजवळ, देगलूर नाका, नांदेड 12 पांडुरंग शिवनाथ बंधागर राष्ट्रीय महामार्ग, नांदेड, विमानतळ, नांदेड 13 अब्दुल वाहिद अब्दुल खलील पीरबाजार नगर, नांदेड, विमानतळ, नांदेड 14 राहुल जनार्दन ठाकूर गाडेगाव नांदेड, इरकवाडी, नांदेड 15 रघु नारायण भारती पांडववाडी, नांदेड, विमानतळ, नांदेड 16 प्रकाश बालाजीराव येणवाळ अंबाजोगाई रोड, नांदेड, नांदेड 17 दिलीप बालाजी शिंदे गोविंद चौक, नांदेड ग्रामीण, नांदेड 18 समीर कोठडिया आशिफ शिवाजीनगर रोड, नांदेड, विमानतळ, नांदेड 19 शेख फैय्याज शेख नईम आसरानगर, नांदेड, विमानतळ, नांदेड 20 मोहम्मद शाहरुख मोहम्मद कलीम पिपळे गंज गल्ली नं.22, नांदेड 21 माधव विठ्ठल डोंगरे गोविंद चौक, नांदेड, विमानतळ, नांदेड 22 राजेश विश्वास बाखळे प्रभाग क्र.1, नांदेड, विमानतळ, नांदेड 23 शिवराज शीतलसिंह परमार बाफना नगर कॉलनी, नांदेड 24 राजू नंदकिशोर कुडले जनता नगर, नांदेड 25 राजसिंह भगवानसिंह ठाकूर गाडेगाव नांदेड, इरकवाडी, नांदेड असे एकूण 41 जुगारी सापडले आहेत. काही जणांनी आपले नाव खोटे सांगितले होते. नंतर त्यांची आधार आयडी पाहून नावे लिहिण्यात आली. हे कला आणि क्रीडा केंद्र चालवणारा पत्रकारांना सांगत होता की आमचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे.चार महिन्यांपूर्वी आम्ही आपला कार्यभार सुरु करण्या अगोदर पोलीस ठाण्यात सर्व कागदपत्रे जमा केली होती. नंतरच हा कारभार सुरू केला आहे. पण चार महिन्याच्या या कारभारात किती खेळाडू त्यांनी तयार केले असतील याचा अंदाज छायाचित्रात दिसणाऱ्या टेबल टेनिस साठीच्या टेबलावरून येतोच आहे.सोबतच टेबल टेनिस खेळण्यासाठी किती उत्कृष्ट वातावरण तेथे तयार करण्यात आले आहे. याचाही अंदाज तेथील विटकरांच्या भिंती सांगताच आहेत. वाचकांनी सांगावे किती छान कारभार सुरु केला होता.पण पोलीस उप महा निरीक्षक शहाजी उमाप पथकाने सर्व उधळून लावले आहे.पण आज पुन्हा तेथे कारभार सुरु नसणार याचा काही नेम नाही. Kanthak Suryatal Post Views: 5,658 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कविरत्न रंजन इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन. पुंडलिक तरटे यांचे निधन