नांदेड : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सिडको येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे . आज दिनांक 26 मार्च रोजी श्रीराम जन्म किर्तन , श्री राम जन्मोत्सव आणि श्री रामाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे . तर दिनांक 27 मार्च रोजी श्री लक्ष्मीकांत रवंदे यांच्या संगीत विद्यालयाचे सादरीकरण रामधुन हा भक्ती संगीतावर आधारित कार्यक्रम होणार असून दुपारी बारा वाजता श्रीरामाची आरती आणि महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम मंदिर संस्थान रामनगर सिडको नांदेड यांच्या वतीने देण्यात आली आहे. प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी याही वर्षी श्री राम मंदिर संस्थान रामनगर सिडको यांच्यावतीने श्री रामकथा आयोजित करण्यात आली होती. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रवचनकार श्री प्रणव जनार्धन पटवारी माजलगाव यांच्या सुमधुर वाणीतून श्री रामकथा लाखो भाविकांनी अनुभवली. तबल्यावर संजय देशपांडे यांनी साथ केली तर संवादिनी अर्जुन गुंडाळे यांनीही सहकार्य केले . गुढीपाडव्यापासून सुरू झालेली श्रीराम कथा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडल्यानंतर आज दिनांक 26 रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री रामकृष्ण गोविंदराव जामकर यांचे श्री राम जन्म कीर्तन आयोजित करण्यात आली आहे. दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव पाळणा , महारती होणार असून सायंकाळी सहा वाजता श्रीरामाच्या भव्य मूर्तीची शोभायात्रा श्री राम मंदिर शिवाजी चौक ते राम मंदिर परिसरात काढण्यात येणार आहे. शोभायात्रेसह राम जन्मोत्सव , पाळणा महाआरती आणि रामजन्म कीर्तनात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून दिनांक 27 मार्च रोजी रामधून आणि श्रीरामाची आरती आणि महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री राम मंदिर संस्थान विश्वस्त मंडळ रामनगर सिडको यांनी केले आहे Kanthak Suryatal Post Views: 545 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त होऊनही माहितीवर पडदा; पोलीस- महसूल वाद उफाळला? पोलिसांना चूक ठरवण्याची हिम्मत दाखवायला हवी ! भोकरमध्ये गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर पोलिसांची कारवाई; 55.03 लाखांचा मुद्देमाल जप्त