धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो ३६ उपासकांसह थायलंड दौऱ्यावर

नांदेड – येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, संघनायक तथा धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो हे  दि. २२ मार्चपासून बौद्ध राष्ट्र थायलंडच्या धम्माभ्यास दौऱ्याकरिता येथील हुजुरसाहेब नांदेड रेल्वेस्थानकावरुन रात्री १०.४० वा. रवाना झाले आहेत. ते तेलंगणा मार्गे बँकाक, पाटाया, धम्मगया, आयुथाया अशा विविध ऐतिहासिक ठिकाणी जाणार असून तेथील बौद्ध संस्कृती व लोकजीवनाचा अभ्यास करणार आहेत. धम्माभ्यास दौऱ्याकरिता जाणाऱ्या ३७ बौद्ध उपासक उपासिकांसाठी मंगल कामना व्यक्त करण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर श्रामणेर भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
         श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बौद्ध उपासक उपासिकांसाठी जगातील बौद्ध राष्ट्रांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. धम्मदीक्षा सुवर्ण काळाचे औचित्य साधून सदरील दौरा आयोजित करण्यात आला आहे. यात ‌भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह अशोक कोल्हे, अरुणा कोल्हे, दैवशाला गोंडाणे, संघमित्रा पंडित, वंदना थोरात, वंदना नरवाडे, यशोधरा नरवाडे, अशोक ढबाले, चतुरा ढबाले, गणपत नरवाडे, गंगासागर इंगोले, भानुदास सोनकांबळे, उर्मिला सोनकांबळे, गोविंद पोहरे, दैवशाला पोहरे, देवानंद नवघडे, खुराजी भगत, माया भगत, मोहन गर्दनमारे, शिला गर्दनमारे, मधुकर सोनकांबळे, सुमन सोनकांबळे, प्रकाश सुर्यवंशी, आशा सूर्यवंशी, शकुंतला वडगावकर, नंदा गोवंदे, ज्योती गोवंदे, नामदेव आठवले, वंदना आठवले, रामराव बोधने, जयश्री डोंगरे, समाधान सुर्वे, सुष्मिता सुर्वे, निवृत्ती पिंपळे, सुभाष डोंगरे हे बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले आहेत. हा दौरा २९ मार्च पर्यंत चालणार असल्याचे भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!