नांदेड – शहरातील गुरूद्वारा गेट क्रमांक ४, बडपुरा परिसरात स्थित असलेल्या ऐतिहासिक श्री गुरूदास हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे २५० वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर असून, त्या काळापासून येथील शीख समाजाच्या वतीने हनुमान जयंतीचा उत्सव श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा आजही अखंड सुरू आहे. या मंदिराची विशेष बाब म्हणजे येथे दररोज नियमित पूजा-अर्चना केली जाते. हनुमान जयंतीनिमित्त विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नांदेड तसेच परिसरातील विविध भागांतून सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवात नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी स्वतः उपस्थित राहून मंदिरात दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच अनेक नागरिक व यात्रेकरूंनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सेवा कार्य कैलासवासी स. अग्रेंज सिंघ संधू परिवाराच्या वतीने करण्यात आले. सध्या नांदेड मर्चंट बँकेचे व्यवस्थापक स. मनजींत सिंघ संधू हे ही सेवा निष्ठेने पार पाडत आहेत. उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडला असून, या उपक्रमामुळे समाजात एकात्मता व धार्मिक सलोखा दृढ होत असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले. – राजेंद्र सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड 7700063999 Kanthak Suryatal Post Views: 767 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खंडणीच्या आरोपातील युटूबर पत्रकार शेख याहियासह १८ जणांचे अतिक्रमण जमीनदोस्त नांदेड शहरात साडे दहा लाखांची जबरी चोरी;किनवट तालुक्यात घर फोडले