नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलिस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू तस्करीवर मोठा आळा घातला असून तब्बल १ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीत १७ मार्च रोजी सायंकाळी ६.२७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथकाने मुगट शिवारात गोदावरी नदी पात्रात छापा टाकला. या कारवाईत वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी साधने जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात पाच लाख लिटर क्षमतेचे इंजिन बोट व वाळू उपसा साहित्य (अंदाजे किंमत १,००,२५,००० रुपये), एक इंजिन बोट (किंमत ५,००,००० रुपये) तसेच ३५ ब्रास अवैध वाळू (किंमत १,४०,००० रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी दिगंबर पाटील करडीले,बालाजी सपुरे,गजानन करडीले,ज्ञानेश्वर आनंदा म्हस्के सर्व राहणार नागापूर आणि करण मोरे,छगन बुकतरे राहणार ब्राम्हणवाडा तसेच देवानंद दुधमल अश्या सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उप अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस अधिकारी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण,पोलीस उप निरीक्षक कांबळे व पोलीस अंमलदार चक्रधर,वानोळे आणि महसूल पथकाने केली. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू तस्करीवर मोठा प्रतिबंध बसणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संबंधित व्हिडीओ ..
