नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद परिसरात राहणारे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अड़.अमरजीतसिंघ गुरुबक्षसिंघ रामगडिया (वय 84 ) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नांदेड शहरासह शीख समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. अड़.अमरजीतसिंघ रामगडिया यांनी अनेक वर्षे न्यायालयात वकिली व्यवसाय प्रामाणिकपणे सांभाळला. कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करताना समाजातही सक्रिय सहभाग नोंदवला. क्रीडा व सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. सर्वांशी हसतमुखाने संवाद साधण्याची त्यांची शैली आणि आपुलकीची वागणूक यामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांची अंतिम यात्रा उद्या सकाळी १०. ३० वाजता त्यांचे निजी निवासस्थान बसंत बसेरा वजिराबाद येथून निघणार आहे. अड़ अमरजीत सिंघ रामगडिया यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रामगडिया कुटुंबियांसह मित्रपरिवार आणि समाजात शोककळा पसरली आहे.वास्तव न्यूज लाइव परिवार भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 638 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारतीय जनतेच्या प्रेमा मूळे हार्मोन्झ समुद्र धुनीतून जहाजे सोडली इतर कोणामुळे नाही डॉ. आंबेडकर नगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धोधन सावंत