नांदेड (प्रतिनिधी)- मुद्दखेड पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ट्रॅक्टरमधील इंजिन चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन ट्रॅक्टर इंजिन व दोन बॅटऱ्या जप्त केल्या असून सुमारे 80 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी मुदखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 44/2026 दाखल करण्यात आला असून BNS 2023 च्या कलम 303(2), 3(5) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 4 व 8(7) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांना 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता गुप्त माहिती मिळाली की, काही इसम ट्रॅक्टरमधील इंजिन चोरी करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता 11 मार्च रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मौजे माळकौठा शिवारात ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून तीन ट्रॅक्टर इंजिन (सुमारे 75 लाख रुपये) आणि दोन बॅटऱ्या (सुमारे 5 लाख रुपये) असा एकूण 80 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी विनोद पाटील उबाळे (वय 30, रा. मारतळा), विलास पाटील भरकडे (वय 35), गजू पाटील हातणे (वय 28) आणि सतीश भरकडे (वय 32) अशा आरोपींची नावे समोर आली आहेत. पुढील तपास मुद्दखेड पोलीस करत असून चोरीच्या इतर घटनांशी आरोपींचा संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे. हि कार्यवाही पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात मुदखेडचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण,महसूल अधिकारी राजकुमार म्हसे,पोलीस उप निरीक्षक शिवाजी शिंदे,पोलीस अंमलदार दिलीप चक्रधर,समदानी,जावेद यांनी केली.जप्त केलेला मुद्देमाल अवजड असल्याने जिलेटीनचा उपयोग करून जागीच नष्ट करण्यात आलं आहे. संबंधित व्हिडिओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-12-at-15.33.59.mp4 Kanthak Suryatal Post Views: 712 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई : जबरी चोरी प्रकरण उघड, दोन आरोपी अटक; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : 36 जिवंत काडतूसांसह दोन जण ताब्यात