नांदेड – जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प (नांदेड शहर) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच प्रत्येक अंगणवाडी बीटमधून एक उत्कृष्ट सेविका व एक उत्कृष्ट मदतनीस यांची निवड करून सन २०२५–२६ च्या उत्कृष्ट सेविका व उत्कृष्ट मदतनीस पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र व मानचिन्ह असे होते. पुरस्कारांचे वितरण ॲड. बियाणी मॅडम व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या ॲड. बियाणी मॅडम यांनी महिलांनी दैनंदिन जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. आज महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून आत्मविश्वासाच्या बळावर त्या अशक्य वाटणारी कामेही समर्थपणे पार पाडत आहेत, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. कैलास तिडके यांनी पुरस्कार विजेत्या सर्व सेविका व मदतनीसांचे अभिनंदन करून अंगणवाडीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत यावर्षात आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या अंगणवाडीतील लाभार्थी व पालकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम बौद्ध विहार (देगाव चाळ), नांदेड येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रकल्पातील सर्व सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन शततारका कातकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गुंडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पेंदे, श्रीमती शिसोदे, श्रीमती राहेगावकर, श्रीमती खिराडे, श्रीमती ढोले, श्री आऊलवार, श्री बनसोडे व श्री खूपसे यांनी सहकार्य केले. Kanthak Suryatal Post Views: 508 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तरुणाईत नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव-श्यामसुंदर कदम ६० रुपयांची झळ: घरगुती गॅस महाग ; स्वयंपाकघरात महागाईची जळजळ!