नांदेड : डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी साहेबराव व्यंकटी वडणे (वय 46) यांचे आज दि. 7 मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6 वाजता डॉ. आंबेडकर नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
