नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कार्यवाही नवीन नांदेड (प्रतिनिधी) -अवैध शस्त्रास्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 30 मार्च 2026 रोजी रात्री 12.45 वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे गोपाळचावडी येथील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. यानंतर सकाळी 3.23 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खुर्बोध्दीन अन्वर काजी (वय 27, रा. मोमीनपुरा), अब्दुल अहद परवेज अली खान (वय 24, रा. गाडेगाव), मोहम्मद खाजा मोहम्मद मिरा साब (वय 21, रा. फकीरनगर) यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणात शेख आदिल (पिस्तूल विक्रेता) व आनंद उर्फ चिन्मय सरदार यादव (काडतुसे विक्रेता) हे पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक सिल्वर रंगाचे गावठी पिस्तूल (किंमत 25 हजार रुपये) व दोन जिवंत काडतुसे (किंमत 6 हजार रुपये) यांचा समावेश आहे. पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,स्वप्नील साळुंके,पोलीस अंमलदार मारोती पंचलिंग,शंकर माळगे,समीर अहेमद,सचिन चावरे,धम्मपाल कांबळे,शेख आसिफ,गवेंद्र सिरमलवार,विनोद पवार यांनी हि कार्यवाही केली. पकडलेले आणि पाहिजे असलेले अश्या ५ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अवैध शस्त्रास्त्रांच्या व्यवहारावर पोलिसांनी कडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,094 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हाधिकाऱ्यांकडे देशी बार व्यवस्थापन’ची मागणी; अर्जदारांचा प्रशासनाला अनोखा सल्ला! जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी