नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल २ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २२ फेब्रुवारी रोजी दुपारी गुप्त माहितीनुसार करण्यात आली. पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक कुसमे,भिसे,पोलीस अंमलदार जाधव,केंद्रे,गवेंद्र सिरमलवार,शंकर माळगे,शेख समीर,चावरे यांनी कार्यवाही पूर्ण केली. कारवाईची ठिकाणे मौजे वांगी, इंजेगाव, नागापूर, सिद्धनाथ पुरी, पुणेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सुमारे १० तासांच्या सलग कारवाईत पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. जप्त मुद्देमाल ५ मोठ्या लोखंडी बोटी (प्रति ३० लाख रुपये) – १,५०,००,००० रु. ५ मध्यम बोटी (इंजिनसह) – ७५,००,००० रु. अंदाजे ८५ ब्रास रेती – ४,२५,००० रु. ३ इंजिन – ९,००,००० रु. इतर साहित्य – २५,००,००० रु. एकूण मुद्देमाल – २,६३,२५,००० रुपये गुन्हा दाखल या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६२/२०२६ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २३ फेब्रुवारी रोजी पहाटे नोंदविण्यात आला. आरोपी करण सोनटक्के, शहाजी सोनटक्के, छगन बुकरे (रा. ब्राह्मणवाडा), गजानन म्हस्के (रा. नागापूर) व इतर अनोळखी अशा एकूण ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान काही आरोपींनी नदीपात्रातील बोटी व साहित्य पाण्यात बुडवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करून साहित्य जप्त केले. संबंधित व्हिडीओ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-23-at-14.36.50.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,498 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बांदा येथील अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; पती-पत्नीला मृत्युदंड बिलोलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी