छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता भालके, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद आप्पा होळगे, अधिपरिचारिका श्रीमती साधना भगत,संगीता ताटेवार, कठारे मामा, प्रकाश सर्जे, वाहन चालक रवि वाठोरे, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, श्रीमती तुळजा पवार,काळे, गंगाधर शिंदे, सुरक्षारक्षक संदीप, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!