नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (गांजा) प्रकरणी धडक कारवाई करत सुमारे ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या हाकेला प्रतिसाद देत मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस अंमलदार दिलीप कुमार चंचलवर,उमर शेख,मारोती पवार,संजय चापलवार,सिद्धार्थ सोनसळे यांनी ही कार्यवाही केली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे २२ किलो ६५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत २ लाख २५ हजार रुपये आहे. याशिवाय एका चारचाकी वाहनासह एकूण ६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी सदरात शेख अरबाज शेख बाबू (२२) रा. रशीद टेकडी भोकर,शेख फयूम शेख मुफ्ती रा. सईद नगर भोकर अशी आहेत यातील दुसरा फरार आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून गांजाचा पुरवठा कुठून केला जात होता याचा शोध घेतला जात आहे. नांदेड पोलिसांनी नागरिकांना अंमली पदार्थां विरोधात माहिती देण्याचे आवाहन केले आहे Kanthak Suryatal Post Views: 878 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 लाखांचा गुटखा जप्त, चार आरोपींवर गुन्हा नांदेड विभागाची तिकीट तपासणी महसूलामध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी;12.59 कोटी महसूल प्राप्त