माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच निधन;देहदानाचा केला होता संकल्प

अंत्यदर्शनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात उसळला जनसागर
बिलोली- बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र तथा माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच दि.१० रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी नांदेड येथील अश्विनी रूग्णालयात उपचार घेत असतांना सकाळच्या सुमारास दुखद निधन झाले आहे.
ही वार्ता समजताच येथील नगरपालीकेचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी रुग्णालयात धाव घेतली.त्या नंतर ही वार्ता वार्यासारखी शहरासह तालुक्यात पसरताच आपल्या लाडक्या नेत्याच्या देहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जोत तो वैद्यकीय महाविद्यालयात जावून अंत्यदर्शन घेतले.
स्वर्गीय माजी आ.गंगाधरराव पटणे हे देगलूर बिलोली मतदारसंघाचे १९७८ या वर्षी प्रतिनिधित्व केले.त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंतराव अमृतराव चव्हाण यांचा ८७७१ मतानी पराभव करून ते विजयी झाले होते.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत ते २.५ वर्ष तर ०८ जुलै १९९८ ते ०७ जुलै २००४ या काळात सहा वर्षे विधानपरिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.ग्रंथ हेच खरे गुरू या विचाराने प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी आयुष्य वेचले होते.महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रंथालय चळवळीला बळ दिले.गावोगावी वाचनालय असावेत व विचार जागृत व्हावेत यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.ग्रंथालय संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष,ग्रंथालय संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष तर बिलोली नगर पालिकेचे साधारणतः१२ वर्षे नगराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली होती.१९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्करराव पाटील खतगावकर यांनी पराभूत केले होते.दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिम फायनान्स कॉर्पोरेशन लि.मुंबईचे नांदेड जिल्ह्याचे संचालक म्हणून सतत तीन वेळा निवडून आले आहेत. १९९१-९२ मध्ये त्याच संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.बिलोली सेवा सहकारी चेअरमन आहेत.
पुरोगामी विचारधारा असलेल्या आमदार पटणे यांनी तत्कालीन आमदार स्वर्गीय गंगाराम ठक्करवाड यांना जनता दलाची उमेदवारी मिळवून देणे व निवडून आनणे यात माजी आ.गंगाधर पटणे यांचा सिंहाचा वाटा होता.आमदार म्हणून सभागृहात त्यांनी अनेक महत्वपूर्ण प्रश्नाला वाचा फोडली होती.विशेषत:माजी पंतप्रधान देवेगौडा व महाराष्ट्रातील स्वर्गीय बापूराहेब काळदाते,मृनालताई गोरे,निहाल अहेमद,सद्याच्या राष्टवादी काँग्रेस प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय व्यक्तीसमवेत त्यांचे जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध होते.बिलोली तालुक्यातील आंतर भारती संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहिले आहे त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय,शेक्षणिक क्षेत्रात मोठी दरी निर्माण होईल मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्यांनी केला असल्याने त्यांच्या पार्थिव देहावर आज सांयकाळी ०६ वाजता नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे अंतिम दर्शनानंतर देहदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!