नांदेड(प्रतिनिधी)-जब जब प्यार पे पहरा हुवा है.. प्यार और भी गहरा गहरा हुवा है। हे गित सडक या चित्रपटातील आहे. त्याप्रमाणे सक्षम हा आँचलच्या प्रेमात रमलीला होता आणि आँचल त्याच्या प्रेमात रमलेला होता. ऑँचलच्या म्हणण्यानुसार जयभिमवाला आहे म्हणून सक्षमचा खून माझे वडील, माझे दोन भाऊ आणि त्यांचे काही मित्रांनी मिळून केला. आज पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी या खून प्रकरणातील चार जणांची पोलीस कोठडी दुसऱ्यांदा वाढूवन दिली आहे.
27 नोव्हेंबर रोजी सक्षमचा खून झाला. या प्रकरणात त्याच्या आईसह आजपर्यंत सात जणांना अटक झाली. त्यातील एक अल्पवयीन आहे. या प्रकरणातील आई आणि इतर चार जणांना न्यायालयाने 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर त्यानंतर 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर अशी पोलीस कोठडी दिली. यादरम्यान 1 डिसेंबर रोजी आँचलच्या आईला न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून दिली नाही.
आज पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सरबजितसिंघ पुसरी, पुजलवाड, रहेमान आणि बालाजी लामतुरे यांनी गजानन बालाजी मामीलवाड, साहिल मदनसिंह ठाकूर उर्फ मामीलवाड, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुदळेकर या चौघांना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला(डांगे) यांनी या प्रकरणाला तपासात प्रगती आणण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयाने ती मान्य करत दोन दिवस अर्थात 6 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. या प्रकरणातील सातवा आरोपी आमन देविदास शिरसे हा अगोदरच 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
म्हणूनच विचारवंत म्हणतात आँचल आणि सक्षम सारखे किती तरी जोडपे सुखा-समाधानाने संसार करु शकले असते. पण त्यासाठी माणुसकी नावाची जात समाजाला मान्य व्हायला हवी होती.
संबंधीत बातमी…
