स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी-२०२५ परीक्षांना ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दि. २ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांचा मतदान केंद्र म्हणून वापर होत असल्यामुळे दि. १ डिसेंबर व २ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे यांनी दिली.
रद्द झालेल्या परीक्षा संबंधित अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात येणार असून याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी अद्ययावत वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच ही सूचना सर्व संबंधित विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
