नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जानेवारी ते जून 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी केले आहे. तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 2 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 4 मे, 3 जून 2026 या दिवशी आहे. धर्माबाद येथे 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 6 मार्च, 6 एप्रिल, 6 मे, 5 जून 2026 यादिवशी करण्यात आले आहे. किनवट येथे 9 जानेवारी, 9 फेब्रुवारी, 9 मार्च, 9 एप्रिल, 11 मे, 10 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. मुदखेड येथे 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च, 13 एप्रिल, 13 मे, 12 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. माहूर येथे 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 16 मार्च, 15 एप्रिल, 15 मे, 15 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. हदगाव येथे 19 जानेवारी, 18 फेब्रुवारी, 18 मार्च, 17 एप्रिल, 18 मे, 18 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. धर्माबाद येथे 23 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 23 मार्च, 23 एप्रिल, 22 मे, 22 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. हिमायतनगर येथे 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 27 मार्च, 27 एप्रिल, 26 मे, 25 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. किनवट येथे 30 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 30 मार्च, 29 एप्रिल, 29 मे , 29 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वरील शिबिराच्या दिवशी स्थानिक सुटटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेमध्ये बदल होवू शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 659 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोहा येथे समता सैनिक दल पुर्व प्रशिक्षण शिबीर संपन्न राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणिती कूटप्रश्नांची निर्मिती