छत्रपती संभाजीनगर – उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे १४ नोव्हेंबर, २०२५ पत्रान्वये पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून दिली असून सुधारित कार्यक्रम जाहिर केला आहे.
हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दिनांक २८ नोव्हेंबर, २०२५, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक ०३ डिसेंबर, २०२५, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक ०३ ते १८ डिसेंबर, २०२५, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दिनांक ०५ जानेवारी, २०२६, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दिनांक १२ जानेवारी, २०२६ असा केला असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
