पोलीस अंमलदार ज्वाला सिंग सिद्धसिंग बावरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास 11 वाजता ते सहकाऱ्यांसह शहरात गस्त घालत होते. यावेळी बसस्थानकाजवळ संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्याची ओळख शेख अतीक शेख शफी (२७), रा. दर्गा रोड, कुर्बान अलिशा नगर, परभणी अशी पटली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.
सदर शस्त्रसाठा तत्काळ जप्त करण्यात आला असून जमादार ज्वाला सिंग बावरी यांच्या फिर्यादीवरून शेख अतीक याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, तसेच उमाकांत पुणे, पोलीस अंमलदार हबीब चाऊस, रमेश सूर्यवंशी, मारुती मुसळे, संतोष पोकळे, गणेश धुमाळ, विलास कदम आदी अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन ही यशस्वी कारवाई केली.
